फलटण प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सेलच्या फलटण शहर उपाध्यक्षपदी विक्रांत मधुकर काकडे व अनुसूचित जाती सेलच्या फलटण शहर उपाध्यक्षपदी विकी रामभाऊ बोके यांची नियुक्ती करण्यात आली. मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचने नुसार वरील नियुक्त्या करण्यात आल्या. नियुक्तीपत्र माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धयौशिल कदम,भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे,पु्र्वचे तालुकाध्यक्ष बजरंग गावढे,पश्चिम तालुकाध्यक्ष अमोल सस्ते,मा.नगरसेवक दत्ता अहिवळे,मा.नगरसेवक सचिन अहिवळे, मध्य रेल्वे मंडळाचे सल्लागार रियाजभाई इनामदार व मंगळवार पेठेतील भारतीय पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.