फलटणच्या स्थानिक राज्यकर्त्यांनी फलटण शहराचा विकास करताना मलटणला दुजाभावाची वागणूक दिली असल्याने मलठणचा विकास होऊ शकला नाही. मात्र आता देशाप्रमाणेच राज्यातही भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्याने विकासात्मक कमाला निधी कमी पडणार नाही. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मलठणचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ॲड.सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून व ॲड. सौ.जिजामाला नाईक निंबाळकर सदस्य जिल्हा परिषद सातारा यांच्या नियोजन फंडातून मंजूर झालेल्या प्रभाग क्रमांक 4 व प्रभाग क्रमांक 5 मधील ते 30 लाख 28 हजार रुपयाचे एच.टी.लाईन व एल.टी.लाईन अंडरग्राउंड कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी ॲड. सौ.जिजामाला नाईक निंबाळकर बोलत होत्या.
यावेळी मा.नगरसेवक अशोकराव जाधव, सौ.जाधव, सचिन अहिवळे, श्रीमती. मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. मदलसा कुंभार, सौ. मिना नेवसे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक-निंबाळकर, भाजपा फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते, किरण राऊत, यांच्यासह विविध पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.