Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार - मंत्री चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा घेतला आढावा
टीम : धैर्य टाईम्स

 मुंबई, दि. 13 : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामाजिक प्रश्नांची जाणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या आता पाच लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            एसएनडीटी विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत किंवा सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी झाला पाहिजे. सामाजिक अडचणीवर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नेतृत्व गुण धारण करून लोकशाहीचा विकास आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ७० हजारावरून  आता ५ लाख करण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास दीडपट वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव विद्यार्थ्यांचा खर्च राज्य शासन करेल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवितव्य, राष्ट्राची संपत्ती व उद्याची उमेद आहे. राज्यातील शैक्षणिक परिस्थिती पाहता आणि भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि कमी खर्चात उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे मोठे आव्हान आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            शासकीय महाविद्यालय आणि खाजगी महाविद्यालय यामधील शैक्षणिक शुल्कामध्ये मोठी तफावत आहे. शैक्षणिक वृद्धीसाठी ही तफावत कमी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार उच्च शिक्षण मिळाले पाहिजे.यासाठी उच्च शिक्षण विभागांतर्गत नावीन्यपूर्ण शैक्षणिक योजना, विविध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट नियोजन करावे, तसेच शैक्षणिक चळवळ सुरू राहावी  यासाठी क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विभागाने नियोजन करावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांनी  तीन महिन्यात प्रक्रिया सुरू करावी

            राज्यशासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने अकृषी विद्यापीठसंलग्न महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच दर पाच वर्षांनी नॅक पुनर्मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. राज्यातील अद्यापही नॅक मूल्यांकन पूर्ण न केलेल्या महाविद्यालयाने पुढील तीन महिन्यात  नॅक  मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू न केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

नवीन ग्रंथ विक्रीसाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही

            राज्यातील तालुका पातळीवर ग्रंथ विक्रीची पुरेशा प्रमाणात व्यवस्था नसल्याने ग्रंथालयात वाचकांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित ग्रंथालय व्यवस्थापनाने  ग्रंथ प्रकाशक/ग्रंथ विक्रेता यांना नवीन ग्रंथ विक्रीस परवानगी देवून व्यवस्था करावी. जिल्हा, तालुका पातळीवरील 'अ' दर्जा वर्ग शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात प्रकाशक ग्रंथ विक्रेता यांना नवीन ग्रंथ विक्रीस परवानगी देणे ग्रंथालय व्यवस्थापनाचा निर्णय असेल त्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

            ज्या विभागीय स्तरावर एसएनडीटी कॅम्पस नाही त्या ठिकाणी नवीन कॅम्पस सुरू करावे, सार्वजनिक ग्रंथालयांची दर्जा वाढ करताना आवश्यक तेवढेच पॅरामीटर्स ठेवून दर्जावाढ द्यावा, फिरत्या वाचनालयांची संख्या वाढवावी, अनुदान वितरण ऑनलाईन करावे, तीन वर्षातून एकदा ग्रंथालयाची तपासणी करावी, पदोन्नती व इतर अडचणींबाबत आढावा, व्यावसायिक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क यावर्षी निश्चित झाले आहे. त्यापैकी दहा टक्के प्रकरणांचे शुल्क निर्धारणाची तपासणी करावी, विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर क्रीडा महोत्सव, युवा महोत्सव आयोजन करावे, एनएसएसची नोंदणी वाढवावी, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

            दि. ११ व १२ सप्टेंबर २०२२ रोजी या दोन दिवसीय बैठकीत  विद्यापीठ, महाविद्यालय, तांत्रिक, सामान्य शाखा, राष्ट्रीय शिक्षण धोरण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, कला संचालनालय, सीईटी, एफआरए, एमएसबीटीई, एमएसएफडीए, रुसा, राष्ट्रीय सेवा योजना या विषयावर सादरीकरण करून सविस्तर चर्चा करण्यात आली.

            या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, रुसाचे प्रकल्प संचालक निपुण विनायक, एफआरए सचिव लहुराज माळी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER