फलटण प्रतिनिधी -
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या विविध फंडातून मंजूर झालेल्या कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आ.श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर मा. सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते मा. आ. दिपकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली मंगळवार दिनांक १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होत आहे. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा. अध्यक्ष, जि.प. सातारा, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण यांची प्रमुख उपस्थितीअसणार आहे.
यावेळी पुढील विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. सासवड ते बडेखान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण ४ कोटी ५० लाख, सासवड ते घाडगेवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण २ कोटी ५० लाख, सासवड हिंगणगाव रोड सासवड गावाजवळ मोठा पूल बांधणे २ कोटी ५० लाख, सासवड तरडगाव रोड सासवड गावाजवळ (मस्कोबा मंदिरासमोरील) मोठा पूल बांधणे १ कोटी ५० लाख, सासवड मुळीकवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण १ कोटी ५० लाख, कोळेकर वस्ती अंगणवाडी इमारत ११ लाख २५ हजार, कब्रस्तान ऑल कंपाऊंड १२ लाख. तर पुढील विकास कामांचे भूमिपूजन समारंभ होणार आहे. जलसंधारण विभाग तीन सिमेंट बंधारा १ कोटी, सासवड तडगाव रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण २ कोटी ५० लाख, श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर परिसर सुशोभीकरण १० लाख रुपये.
यावेळी धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट मा.जि.प.सदस्य, मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य, सातारा, डॉ. बाळासाहेब शेंडे चेअरमन, श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, धनंजय पवार चेअरमन फलटण तालुका दुध पक्ष संघ, सौ प्रतिभाताई धुमाळ मा. सभापती पचायंत समिती फलटण, संतोष जगताप संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.