फलटण - गेल्या अनेक दिसांपासून फलटण तालुक्यातील अनेक दिग्गज नेते, कार्यकर्ते यांनी भाजपाची वाट धरली आहे तर विविध भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा भाजपच्या गोटात सामील होताना दिसत आहेत. आज भिलकटी येथील बौद्ध समाजातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
फलटण - कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीने जोरदार फिल्डिंग लावली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सचिन पाटील यांना मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड.सौ.जिजामाता नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे -पाटील, माणिकराव सोनवलकर, डी. के. पवार, विलासराव नलवडे, आदी महायुतीचे नेते विजयासाठी प्रयत्नशील आहेत.
आज भिलकटी येथील बौद्ध समाजातील सिद्धार्थ कांबळे, प्रसनजित कांबळे, प्रतिक कांबळे, रोहित कांबळे, खप्निल कांबळे, विकास कांबळे, सुहास कांबळे, संदिप कांबळे, अनिल बनसोडे, तेजस कांबळे, दत्तात्रय कांबळे, अमोल कांबळे, अनिष कांबळे शंतनु कांबळे, मोहन कांबळे, प्रदिप कांबळे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.