फलटण प्रतिनिधी - मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून फॉर्म भरण्याचा कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पला प्रचंड प्रतिसाद महिला वर्गातून मिळाला होता. या कॅम्पमध्ये 800 महिलांचे अर्ज भरण्यात आले. होते. भरलेल्या 800 पैकी 800 महिलांचे पैसे रक्कम रुपये 3000 हे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत याबद्दल सर्व महिलांच्या कडून सरकार व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मनःपूर्वक आभार मनात असल्याचे भाजपा फलटण शहर अध्यक्ष माजी नगरसेवक अनुप शहा यांनी म्ह्टले आहे.
कॅम्पमध्ये 800 महिलांचे अर्ज अत्यंत काळजीपूर्वक आलोक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत मठपती माऊली फाउंडेशनच्या सर्व सदस्य विश्वस्त यांनी मोफत भरून वेळेत जमा केल्याने सर्वात आधी या महिलांना पैसे जमा झाले आहेत त्याबद्दल महिला वर्गाकडून फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन यांचे तसेच अनुप शहा यांचे आभार महिला मानले आहेत. महिलांकडून पैसे जमा झाल्याचा स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.