फलटण -प्रतिनिधी
फलटण शहरात डेंग्यू व अन्य साथीच्या आजारांचा फैलाव झाल्यामुळे मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरात सतत पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेली दलदल , निर्माण झालेली अस्वच्छता याचा एकुण फटका लोक आरोग्यावर बसत असल्याच्या पाश्र्वभूमीवर विविध पक्षीय कार्यकर्त्यांनी शहरात स्वच्छता अभियाना०दारे शहर स्वच्छतेच्या कामास सुरूवात केली आहे
फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख व कामगार संघर्ष संस्थापक अध्यक्ष सनी दादा काकडे यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यासोबत शहर स्वच्छतेच्या कामास आजपासुन सुरवात केली आहे
.फलटण शहरातील साथी च्या आजारामुळे ( डेगु) फलटण शहरातील .उमाजी नाईक चौक ते गजानन चौक राम मंदीर या परिसरात स्वछाता अभियान राबविण्यात आले.
फलटण नगरपालिका कर्मचारी व राष्ट्रीय काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कामगार संघर्ष समिती चे पदाधिकारी यांनी स्वछाता अभियान राबविले आले
या अभियानात फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष श्री राजेंद्र खलाटे. फलटण शहर अध्यक्ष श्री पंकज पवार. अनुसूचित जाती जमाती सेल चे जिल्हा उपाध्यक्ष श्री सिध्दार्थ दैठणकर. फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे युवक अध्यक्ष अजिंक्य कदम. शहर अध्यक्ष प्रीतम जगदाळे.फलटण तालुका अनुसूचित जाती जमाती सेल चे तालुका अध्यक्ष अभिजीत जगताप.युवा नेते बबलू मोमीन सामजिक कार्यकर्ते बंटी भैय्या भोईटे.कामगार संघर्ष समिती चे उपाध्यक्ष मंगेश आवळे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री महादेव गायकवाड. सुरज भैलुमे,रोहीत अडागळे ,आदित्य पाटोळे.,अमर झेंडे., वंचित बहुजन आघाडी महीला आघाडी च्या अध्यक्ष सपना भोसले.आदी सहभागी होते
.स्वच्छता अभियानातील सहभागी कार्यकर्त्यांचे फलटण नगरपालिका आरोग्य कर्मचारी व अधिकारी आभार मानले.
दरम्यान मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी फलटण शहरातील स्वछता अभियान साठी ७ दिवस २ ते ५ वेळेत विशेष स्वछता मोहीम राबवण्यात येणार असुन फलटण शहरातील डेगु ची साथ रोखण्यासाठी १५ पथके तयार केली आहेत या मध्ये फॉगींग मशीन व्दारे फवारणी व डि डि टी ( बीसी) पावडर मारणे , गवतावर फवारणी करणे आदी उपाययोजना पालिका करणार असल्याचे मुख्याधिकारी गायकवाड यांनी सांगितले .