सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाढते प्रदूषण नियंत्रणाचा ध्यास घेतला असून संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची चळवळ प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार केला आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरीटीज ट्रस्ट, नीरा उजवा कालवा विभाग, वन विभाग, डॉ.महेश बर्वे आणि तुषार नाईक निंबाळकर यांच्या संयुक्त सहभागाने फलटण शहरात हरित वसुंधरा उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा निर्धार करण्यात आला आह. महाराष्ट्र विधान परिषद dhairyateam कै.अच्युत दत्तात्रय स्मृती हरित वसुंधरा उपक्रमांतर्गत अधिकार गृह इमारतीच्या पश्चिमेकडील भागात नीरा उजवा कालवा आणि वन पिंपळ, हिरडा, विभाग खात्याच्या जागेत वड, चिंच, उंबर, अर्जुन, बाभूळ, करंज, लिंब वगैरे देशी वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावून शहरालगत मोठी वृक्ष राजी निर्माण करून हरित फलटण संकल्पना सावरण्याच्या प्रयत्नातील पहिला टप्पा सुरु करण्यात येत आहे . जागतिक पर्यावरण दिनी आज दि. 5 जून रोजी या उपक्रमाचा प्रारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हस्ते करण्यात येणार आहे .