आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी ने संघटनात्मक नेतृत्वात बदल केले असून सातारा (पूर्व ) जिल्हा अध्यक्षपदी फलटण येथील भीमराव घोरपडे यांची बिनविरोध निवड केली आहे.
वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याचे संघटनात्मक कामकाज सुरळीतपणे व वेगाने होण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचे भौगोलिक सीमांकन निश्चित करून सातारा पूर्व व सातारा पश्चिम असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. त्यानुसार सातारा पूर्व जिल्ह्यामध्ये खंडाळा, माण,फलटण, कोरेगाव ,खटाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सातारा पुर्वच्या जिल्हा अध्यक्षपदी भीमराव घोरपडे यांची निवड करण्यात असल्याची माहिती रेखा ठाकूर प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
भीमराव घोरपडे यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीमुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.