फलटण २९ नोव्हेंबर | धैर्य टाईम्स
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुकही जन्मभूमी असणारे फलटण - कोरेगाव मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील हे आज उत्तर कोरेगाव भागात दौऱ्यावर आहेत. ते आज जनतेचे प्रश्न जाणून घेणार असून त्याचबरोबर मतदारांचे आभार मानणार आहेत. यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तसेच विद्यमान राज्यसभा खासदार मा. नितीन काका पाटील यांचीही उपस्थित राहणार आहेत.
तरी शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता रवी - छाया मंगल कार्यालय, पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.