फलटण प्रतिनीधी :- माढा लोकसभा निवडणुकीच्याच्या निमित्ताने फलटण येथील महाविकास आघाडीच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना धनगर समाजाच्या वतीने त्यांना घोंगडी, काठी व भंडारा देत होते मात्र शरद पवारांनी त्यावेळी सदरील मान स्वीकारला नाही. त्यामुळे पवारांना घोंगडीची ऍलर्जी आहे का असा प्रश्न उपस्थित होत असताना मात्र आज माळशिरस येथे महायुतीच्या वतीने आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान धनगर समाजाच्या वतीने करण्यात आल्यावर मोदींनी घोंगडी अंगावर घेवूनच आपले तुफान भाषण केले. या दोन्ही घटनांमुळे माढा लोकसभा मतदारसंघात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी गजानन चौक फलटण येथील शरद पवार गटाच्या माढा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित सभेत शरदचंद्रजी पवार यांचा सत्कार मतदारसंघातील काही धनगर युवक करण्यास केले असता यावेळी धनगर समाजाचा व बिरदेवाचा प्रतीक असणारी काठी घोंगडी व भंडारा भेट शरद पवारांनी
घेण्यास नकार दिला यावेळी त्यांनी गुलाबाचा हार स्वीकारला पण काठी घोंगडी व भंडारा स्वीकारला नाही. यावेळी धैर्यशील मोहिते – पाटील यांना देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अनेकांचे सत्कार शरद पवार यांनी स्वीकारले पण धनगर समाजाचा काठी घोंगडे व भंडारा याचा सत्कार स्वीकारला नसल्याने घोंगडीची पवारांना ऍलर्जी आहे का? असा प्रश्न धनगर समाज विचारू लागला आहे.
त्यामुळे विविध चर्चाना उधाण आले आहे. माढा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे मतदान आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा मतदानात याचा काय परिणाम होणार हे समजेलच.
कालच्या सभेतील कृत्यामुळे धनगर समाजात विविध चर्चा सुरू असताना माळशिरस येथे भाजपाचे लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी त्यांना पिवळा फेटा, घोंगडी, काठी व बाळुमामाची मूर्ती भेट देण्यात आली. मोदींनी घोंगडी अंगावर घेवूनच आपले भाषण व्यक्त केले."येळकोट येळकोट जय मल्हार"
"बाळुमामाच्या नावानं चांगभलं" अशी जयघोषाने भाषणा सुरुवात केली. एकंदरीतच दोन दिवसात घडत असलेल्या घडामोडीमुळे माढा लोकसभा मतदारसंघात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत हे मात्र नक्की.