फलटण | धैर्य टाईम्स ४ जानेवारी २०२४
फलटण येथील श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रमोद उर्फ आबा खलाटे व त्यांच्या कुटुंबीयांनी यांनी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या फलटण तालुक्यातील विकास कामावर प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी मलठण मधील त्यांचे कुटुंबीय हजर होते. या प्रवेशासाठी मलठण मधील जेष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांचे कडून विशेष प्रयत्न करण्यात आले.
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप मध्ये त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रमोद उर्फ आबा खलाटे यांच्या भाजपा प्रवेशाने मलटण मधील भाजपाची ताकत वाढली आहे.