फलटण : मौजे सासकल ता. फलटण जि. सातारा येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची नुकतीच पालक सभा विद्यालयामध्ये संपन्न झाली. विद्यालयाच्या शालेय गुणवत्ते संदर्भात व भौतिक सुविधा संदर्भात अनेक अडचणींचा विचार करून शालेय गुणवत्ता वाढवण्यावर येणाऱ्या काळात भर देण्याविषयी या पालक सभेमध्ये चर्चा करण्यात आली. याच चर्चेदरम्यान सन २०२४ - २०२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड सर्व पालकांच्या सहमतीने बिनविरोध करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा पालक विनायक नारायण मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून संजय प्रभू कर्णे यांची निवड झाली. या समितीच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून हणमंत गंगाराम मुळीक, सदस्य म्हणून शामराव गजानन मुळीक, लक्ष्मण पांडुरंग मुळीक, निकिता दीपक घोरपडे, देवदास नारायण सुतार, नवनाथ खोमणे, माधुरी भास्कर मदने, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ओंकार दादासो मुळीक, तन्वयी मच्छिंद्र मुळीक, शिक्षणतज्ञ म्हणून शंकर राजाराम मुळीक, शिक्षक प्रतिनिधी म्हणून शिवाजी चंद्रकांत सुतार यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे पालक व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, जि. प प्राथमिक शाळा सासकल चे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संदीप अशोक मुळीक, उपाध्यक्ष दिनेश दत्तात्रय मुळीक, ग्रामपंचायत सदस्य मोहनराव मुळीक, मनोहर संभाजी मुळीक, लता विकास मुळीक, चांगुणा सर्जेराव मुळीक, लक्ष्मी रमेश आडके, नीलम वैभव सावंत, सोनाली मंगेश मदने,कमलाकर आडके, ज्ञानेश्वर नरसिंग मुळीक, ज्ञानेश्वर हरिबा मुळीक, सदानंद निळकंठ मुळीक, माजी सरपंच लक्ष्मण गणपत मुळीक, सोपान रामचंद्र मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी मुळीक, शाळा सुधार संघटनेचे पदाधिकारी सर्वांनी अभिनंदन केले आहे.