फलटण प्रतिनिधी : माढा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण तालुक्यातील विविध भागात आरपीआय ने प्रचारात आघाडी घेतली असल्याचे जिल्हासचिव विजय येवले यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (आठवले गट ) राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीचे भाजपचे माढा लोकसभा मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एकूणच मतदार प्रचारात आघाडी घेतल्याची दिसून येत आहे.
फलटण तालुक्यातील पूर्व भागातील राजाळे, गुणवरे, गोखळी, आसू, पवारवाडी या भागात घरोघरी जाऊन माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशात पंतप्रधान म्हणून आणण्यासाठी मोठी प्रचार यंत्रणा राबवली जात असल्याचे संजय निकाळजे यांनी निदर्शनास आणून दिले. तर फलटणचे भूमिपुत्र खासदार रणजितसिंह पुन्हा खासदार म्हणूनच माढ्याचा विकास करतील असे राजू मारुडा यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागातील प्रचारात जिल्हासचिव विजय येवले,मुन्ना शेख,राजु मारूडा,संजय निकाळजे, सतिश अहिवळे तेजस काकडे,मारूती मोहिते यांच्यासह फलटण तालुक्यातील अनेक आरपीआय कार्यकर्त्यांनी भाग घेतला.