फलटण प्रतिनिधी - राजकीय दृष्टा संवेदनशील समजल्या जाणाऱ्या विडणी गावचे माजी सरपंच व राजे गटाचे कट्टर समर्थक शरद अनंतराव कोल्हे तसेच विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन सुनील काशिनाथ तथा एस के नाळे यांच्यासह विडणीसह धुळदेवचे माजी सरपंच माणिकराव कर्णे, माजी उपसरपंच जालिंदर भिवरकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत भैय्या नाईक निंबाळकर, विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी नगरसेवक फिरोज आता, भाजपा फलटण तालुका मंडल अध्यक्ष बापूराव शिंदे, बाळासाहेब ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बबनराव कर्णे, अक्षय अब्दागिरे, संकेत भुजबळ, विशाल जाधव, वैभव कर्णे,प्रशांत नांदले यांच्यासह 150 हून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. विडणी आणि धुळदेव मधील भाजपा प्रवेशाने राजे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.