Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात हिंदी दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा

नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात हिंदी दिवस व्याख्यान व बक्षीस वितरण समारंभाद्वारे हिंदी प्रबोधन सप्ताहाची सांगता
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :

श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी 'हिंदी दिवस समारोह' कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला वेणुताई चव्हाण कॉलेज कराडचे हिंदी विभाग अध्यक्ष प्रा.डॉ. दिपक जाधव प्रमुख अतिथी व सेंट्रल बँक ऑफ इंडिया फलटणचे शाखा अधिकारी राजेंद्र कांबळे विशेष उपस्थिती म्हणून लाभले होते. 

प्रा.डॉ.दिपक जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदी भाषेचा इतिहास, स्वतंत्रता आंदोलनामध्ये हिंदी भाषेचे योगदान, भाषिक एकता, त्रिभाषा सूत्र, भाषा विकासाचे उपाय, हिंदी भाषेची वैश्विकता, रोजगार परकता, व्यावहारिक उपयोग इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट करतांना सांगितले की, आज जागतिकीकरणाच्या युगात हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही. आपण आपल्या मातृभाषेमध्येच ज्ञान योग्य प्रकारे ग्रहण करू शकतो आणि म्हणूनच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा, संपर्क भाषा, राष्ट्रीय भाषा यांना अत्याधिक महत्त्व देण्यात आले आहे. आपण हिंदी भाषेचा सन्मान करून राष्ट्रीय कर्तव्याची पूर्ती केली पाहिजे. हिंदी ही स्वभाषा, एकात्मता, संस्कृती, राष्ट्रीयता व सन्मानाचे प्रतीक आहे. देशाला महासत्ताक बनवण्यामध्ये हिंदी भाषेचे योगदान अमूल्य असेल. भाषा मनुष्याचा सर्वांगीण विकास करते. भाषेच्या माध्यमातून इतर ज्ञान शाखा अभ्यासता येतात. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये भाषा सर्वात मोठी क्रांती होय. भाषेमुळे माणसाचे जगणे समृद्ध झाले आहे. आज आपण भाषेशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हिंदी भाषा केवळ एशिया पुरती मर्यादित राहिली नसून वरील सर्व सोपस्कार पूर्ण करून ती जागतिक भाषेच्या दृष्टीने अग्रेसर होत आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघ युनोच्या सर्व सदस्यांनी एकमताने हिंदी भाषेला विश्व भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपण 10 जानेवारी हा दिवस 'विश्व हिंदी दिवस' भाषा म्हणून साजरा करतो. 

प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून भाषेची व्यवहारिक उपयोगिता व जीवनामध्ये भाषेद्वारे कसा समतोल साधला जातो याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले.

राजेंद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या व मौलिक मार्गदर्शन केले. 

राष्ट्रभाषा हिंदी दिवसाचे औचित्य साधून 'हिंदी प्रबोधन सप्ताह' च्या अनुषंगाने हिंदी विभाग व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या दरम्यान. रांगोळी, पोस्टर, निबंध, वक्तृत्व, गीत गायन अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी सेंट्रल बँके चे भाषा विकास व सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून आर्थिक सहाय्य लाभले. या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सेंट्रल बँकेच्या वतीने ट्रॉफी व महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटी च्या यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व सौ. वेणुताई चव्हाण फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये खालील विद्यार्थी बक्षीस पात्र ठरले. रांगोळी स्पर्धेमध्ये अनुक्रमे दीक्षा लांडगे, स्नेहा बनकर, साक्षी भगत, ऐश्वर्या कदम, केतकी गायकवाड, पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे दीक्षा लांडगे, केतकी गायकवाड, स्नेहा बनकर, गौरी नामदास, प्रियांका ठोंबरे, निबंध स्पर्धेमध्ये अनुक्रमे दीक्षा लांडगे, केतकी गायकवाड, प्रगती सकट, श्रद्धा पाटोळे व सानिया कुरेशी, वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश बापू नामदास, प्रिया लंभाते, अंकिता भिसे, गीत गायन स्पर्धेमध्ये यश बापू नामदास, आरती कणसे, अंकिता भिसे या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

 या विविध स्पर्धेमध्ये सहभागी चार शाखांपैकी सौ. वेणुताई चव्हाण डी. फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप मिळवली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

या कार्यक्रमाचे आयोजन अग्रणीय महाविद्यालय अंतर्गत व हिंदी विभाग याद्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. विठ्ठल गौंड यांनी मानले. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER