Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

दीपोत्सव आनंदाचा

टीम : धैर्य टाईम्स
Happy Dipotsav
बघता बघता दिवाळी आली. घरातील प्रत्येकाच्या मनात मांगल्याचा नंदादीप तेवत ठेवणारी, प्रत्येक घर आणि प्रत्येक घरातलं प्रत्येक झाड आनंदाने नाचायला लावणारी दिवाळी, वर्षभरात किती अडचणी, खडतर प्रसंग आले तरीही दिवाळीच्या चार दिवसात पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण करणारी दिवाळी.

_दिपोत्सव आनंदाचा_
_हर्षाचा रंग उल्हासाचा_
_आनंदाने अन प्रेमभराने_
_माणूस पण जपण्याचा_
बघता बघता दिवाळी आली. घरातील प्रत्येकाच्या मनात मांगल्याचा नंदादीप तेवत ठेवणारी, प्रत्येक घर आणि प्रत्येक घरातलं प्रत्येक झाड आनंदाने नाचायला लावणारी दिवाळी, वर्षभरात किती अडचणी, खडतर प्रसंग आले तरीही दिवाळीच्या चार दिवसात पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण करणारी दिवाळी.  अगदी ज्याच्या त्याच्या परीने ज्याला त्याला त्याचा हवा तो आनंद मिळवून देणारी आणि आपल्या आगमनाने सारे घर आनंदात न्हाऊन टाकणारी अशी ही दिवाळी. अगदी आगमनाच्या आधीपासूनच घराघरात चैतन्याचे वातावरण निर्माण करणारी, घर लहान-थोर, अबाल-वृद्ध, श्रीमंत-गरीब अशा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा आणि आपल्या रोषणाईने प्रत्येकालाच उजळून टाकणारा हा सण म्हणून सणांचा राजा म्हणून ओळखला जातो.
चार दिवसांच्या या सणात प्रत्येकालाच वर्षभर पुरेल इतकं नवचैतन्य, सामर्थ्य, ऊर्जा देण्याची ताकद आहे. गरीब-श्रीमंत प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे हा सण साजरा करतोच. पणत्यांचा लखलखाट, खमंग पदार्थाचा घमघमणारा वास, पहाटे पहाटे गारठ्यातही उटणे लावून केली जाणारी मोती साबणाने अंघोळ, दारापुढची रांगोळी, अंगावरच्या नवीन कपड्यांचा तो सुगंध, हातात उदबत्ती धरून लागूनच फटाका लावण्यासाठी बालचमुंची चाललेली धडपड, रात्रीच्यावेळी चमचम करत उडणारा फटाक्याचा पाऊस, गोल फिरणारे भुईचक्र आणि काहीच वाजवता येत नाही म्हणून हातात बंदूक आणि टिकल्यांचे रीळ घेऊन फाट- फाट असा तोंडाने आवाज करून इकडून तिकडे फिरणारी चिल्लीपिल्ली. किल्ल्याभोवती गराडा घालून बसलेले छोटेच पण भावी तरुण मंडळाचे कार्यकर्ते. आज आमच्या करंज्या झाल्या, आता उद्या तुमच्या करूया ? काकू, अहो अनारसे नीट आले ना की फिसकटले मागच्या वर्षी सारखे ? अहो, काळे वहिनी, रव्याच्या लाडवाचा पाक अगदी छान साधला हो यावर्षी.  अशा खुमासदार गप्पात रमलेलं महिला मंडळ.
साड्यांचं तर काही विचारूच नका. कुणी कितीची घेतली इथपासून जी सुरुवात होते ती डायरेक्ट प्रत्येकीला पुढच्या दिवाळीत नेऊन ठेवते. मी पुढच्या वर्षी पाडव्याला यांच्याकडून असलीच घेणार, असं म्हणून पुढच्या दिवाळीचे स्वप्न बघत आमच्या महिला मंडळाची इतिश्री होते.
प्रत्येकालाच दिवाळी काही न काही देऊन जाते. प्रत्येकाची ओंजळ भरेल इतकं जरी देता आलं नाही, तरी एखादं फूल का होईना प्रत्येकाच्या ओंजळीत टाकतेच. दिवाळी येते ती खरंच चैतन्याचा सुंदर लेण लेऊन येते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलून जाते. आनंद पेरण्यासाठी येते आणि आनंद रुजवूनच जाते. येते किती दिवसांसाठी? फक्त चार दिवसांसाठी. पण तरीही या चार दिवसात प्रत्येकाच्या मनात चारशे हत्तींची ऊर्जा पेरून आनंद वाटून आणि आनंदाचा ठेवा देऊन जाते. प्रत्येकाच्या मनात आशेचा दीप प्रज्वलित करून जाते. कित्येकांच्या आयुष्यातलं त्यांचं हरवलेले आनंद पुन्हा मिळवून देण्याची आणि त्याच जिद्दीने पुन्हा मिळवून देण्याची उभे राहण्याची ताकद देऊन जाते. मांगल्याचा दीप लावणारी ही दिवाळी म्हणूनच दिपोत्सव ठरते. मनामनात आशा फुलवणारा, निराशा झटकून अशी चौफेर उधळण करणारा असा हा दीपोत्सव, आनंदाचा दीपोत्सव.
कशासाठी बरं येत असेल हा दीपोत्सव? कधी विचार केलात? असुरांचा नाश करण्यासाठी दैवी शक्तीला जन्म द्यावा घ्यावा लागतो. अनितीचा नाश करण्यासाठी नीतीच्या मार्गानेच प्रयत्न करावे लागतात. त्याचप्रमाणे वर्षभर प्रत्येकालाच कायमच सुख, आनंद मिळाला असेलच असं नाही. दुःख, वेदना, क्लेश, मनस्ताप, निराशा असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कमीजास्त फरकाने आलेले असतात. त्या सगळ्यांचा मनावर झालेला ताण, मनावर दाटून आलेले मळभ दूर करून पुन्हा आनंदाची, प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी हा दीपोत्सव येतो.
 _जो गया, सो गया_
_बहुत कुछ करना हैl_
_रुकना नही, तू थकना नही_
_तुम्हें तुम्हारी तकदीर सवारनी है l_
असं म्हणत स्वतःच स्वतःला आत्म प्रेरणा देण्यासाठीच हा दीपोत्सव येतो. आपल्या प्रकाशवाटांनी आपलं आणि इतरांचाही जग नव अजून टाकू, हे सांगण्यासाठी हा दीपोत्सव येतो. आयुष्य अजून खूप बाकी आहे. अजून खूप बघायचयं, अजून खूप लढायचयं. भविष्यातील त्या लढाईसाठी सामर्थ्य पुरवण्यासाठी हा दीपोत्सव येतो.
येतो किती दिवसांसाठी? अवघ्या चार दिवसांसाठी. पण पुढच्या 365 दिवसांच्या जगण्याची ऊर्मी मनात जागवून जातो. मला माझ्यासाठी नाही, तर माझ्यासाठी जे जगतात त्यांच्यासाठी नव्याने जगायचं हे सांगून जातो. माझ्यापेक्षाही भयानक अंधारात जगणारे कितीतरी जीव माझ्या आजूबाजूला आहेत. त्यांच्यासाठी मला दिवा व्हायचंय हे समजावण्यासाठी दीपोत्सव येतो. यावर्षी नसेल यश मिळालं. पण पुढच्या वर्षी जोमाने तयारी कर. यश नक्कीच तुझंच असेल हे सांगण्यासाठी हा दीपोत्सव येतो.
मनाची पुन्हा नव्याने बांधणी करण्यासाठी दीपोत्सव येतो. तुमच्यातील अचेतन चेतना जागृत करण्यासाठी येतो. आनंदाचा एक दीप तुमच्या मनात प्रज्वलित करून त्यातूनच लक्ष दिव्याची दीपमाळ तुझी तुलाच बनवायचे आहे, हे सांगण्यासाठी जणू हा दीपोत्सव येतो आणि मनामनात आनंदाचा पेरा करून जातो.
म्हणूनच तर झटकून टाकूया ती निराशा. काळ्याकुट्ट अंधाऱ्या जगातील वेदनादायी वास्तव आणि सत्याच्या प्रकाशात छान न्हाऊन निघूया. आनंदाचा एक दीप हातात घेऊन आपल्यासारखे असंख्य दीप प्रज्वलित करूया आणि साजरा करूया दीपोत्सव... आनंदाचा. माझ्यासाठी कोणी दिवा म्हणून का यावं? मी का कुणीतरी माझ्या आयुष्यात आनंदाचा दीप घेऊन येण्याची वाट बघायची ? माझं मलाच आता दीप बनायचंय आणि आनंदाचा दिवस बनवून इतरांच्या आनंदाचा मूक साक्षीदार व्हायचं हा एक विचार तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकतो. म्हणूनच कुठून तरी प्रकाशवाट येईल याची वाट न बघता स्वतः प्रकाशाचा हलकासा कवडसा बनून शक्य तितक्या प्रकाशवाटा निर्माण करूया. या दिवाळीत दीपोत्सवाच्या साथीने माणुसकीचा उत्सवही साजरा करूया. आनंद देऊया, आनंद घेऊया. इतरांच्या आनंदाचे कारण बनूया. या आणि साजरा करूया
_दीपोत्सव आनंदाचा_
_प्रकाशाचे वाहक आम्ही_
_प्रकाशवाटा उजळण्या आलो_
_उजळीत आनंदाचे तरा_
_दीप मानवतेचा पेटवण्या आलो_
_दीप अंतरी अखंड तेवावा_
_ठेवा माणुसकीचा सदा जपावा_
_प्रकाशवाटा उजळून अवघा_
_दीपोत्सव आनंदाचा साजरा व्हावा_

संकलन- सौ. आराधना संतोष गुरव, वडूज.
शब्दांकन - प्रकाश राजेघाटगे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER