Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून माणची देशात ओळख याचा अजून एक प्रत्यय

एमपीएससी परीक्षेत माणच्या चौघांचा झेंडा
टीम : धैर्य टाईम्स

दहिवडी  / उमेश बुधावले 

एमपीएससी राज्यसेवा परिक्षा २०२२ चा नुकताच निकाल जाहीर झाला.  महाराष्ट्रात कायम पाणी, चारा व अन्नधान्य याचा दुष्काळी शिक्का असलेल्या माण तालुक्यातील शेकडो रत्नाणी या दुष्काळी परिस्थितीवर मात करत शिक्षण क्षेत्रात अटकेपार झेंडा फडकवत राज्यात तसेच राज्याबाहेर माणच्या मातीचा शिक्षणातून सुगंध पसरवणार्या अधिकार्या मध्ये पुन्हा एकदा माणच्या चौघांनी एमपीएससी मध्ये चौकार मारत एटी सी मध्ये हणमंत बनगर यांनी महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे यश मिळले तर डंगिरेवाडी येथील सोनल सुर्यवंशी ह्या दोघांनी उपजिल्हाधिकारी तर म्हसवडच्या रोहण तावरे व हर्षवर्धन माने या दोघांनी वर्ग एकचे अधिकारी या पदावर आपली मोहर लावल्याने या चौघांचे ही अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे माण तालुका दुष्काळी म्हणून नक्कीच मागासलेला असला तरी या तालुक्यातील तरुणांनी जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रभर बुद्धिवादी तालुका अशी नवीन ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यासह माण तालुक्याच्या टोकावर असणाऱ्या परिसरातील वरकुटे-मलवडी बनगरवाडीतील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हनुमंत जोतीराम बनगर याने एनटीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवीत उपजिल्हाधिकारीपद अनुकूल परिस्थितीवर मात केली. तीन बहिणी, एक भाऊ, आई वडील अशिक्षित, अत्यंत गरिबीच्या परिस्थितत आई वडील भाऊ शेती करत होते हणमंत बनगर यांचे प्राथमिक शिक्षण ५ वी पर्यंत बनगरवाडी (वरकुटे मलवडी) ११ वी १२ वी देवापूर येथे तर ग्रॅज्युएशन कराड येथे करुन एमपीएससी अभ्यासक्रम पूणे येथे क्लासेस लावण्यासाठी पैशाची अडचण अडचण होती त्यामुळे पूणे येथे लेक्चरशिपचे काम करत करत अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करून अभ्यास केला स्पर्धा परीक्षेची पर्व तयारी करत असताना २०१९ मध्ये वडिलांचे छत्र हरपले . कुटुंबात कोणीही उच्चशिक्षित नसताना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि भाऊ संतोष यांच्या पाठबळावर हणमंत स्वजीवनाचा शिल्पकार ठरला. दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी एमपीएससीचा निकाल जाहिर झाला त्यावेळी हणमंत बनगर यांचे मेव्हणे सांगली हाॅस्पिटल मध्ये उपचार घेताना निधन झाले होते ते हाॅस्पिटल मध्ये होते एकीकडे निकालाचा सर्वोच्च आनंद तर दुसरीकडे बहिणीचे मालक( मेव्हणे) वारल्याचे दुख गिळून तिन दिवस कोणाला आपन एमपीएससी मधून उपजिल्हाधिकारी झालो हे बनगर यांनी कळू दिले नाही तिन दिवसा नंतर त्यांनी आपन उपजिल्हाधिकारी झाल्याचे आईला सांगितल्यावर आई व भाऊ संतोष यांच्या आनंदाला पारा उरला नव्हता तर याबाबत हणमंत बनगर यांची प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले, 

    "अधिकारी होण्यासाठी केवळ - जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि - अविरत केलेल्या शैक्षणिक संघर्षाच्या - जोरावर घवघवीत यश मिळवलं आहे."

  माण तालुक्यातील चारी बाजूला डोंगराळ भागा असलेल्या ग्रामीण भागातील डंगिरेवाडी येथील प्राथमिक शिक्षक असलेले व सध्या म्हसवड प्राथमिक शाळा नंबर १ चे शिक्षक रमेश सूर्यवंशी यांची कन्या सोनल हिने २०२१ मध्ये झालेल्या एमपीएससी च्या राज्य सेवा परिक्षे मध्ये यश मिळवत बिडीओ या पदावर आपली पहिल्या प्रयत्न यश मिळाले व त्याचे प्रशिक्षण पूणे येथील यशदा येथे सुरू असताना एमपीएससी च्या राज्यसेवा परिक्षा २०२२ चा १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला त्यामध्ये कु सोनल रमेश सूर्यवंशी हिने उपजिल्हाधिकारी या पदाला गवसणी घालून तालुक्यात या निकाला मध्ये उपजिल्हाधिकारी होण्याचा दुसरा नंबर मिळवला माणच्या इतिहासात एका वेळी दोन उपजिल्हाधिकारी होण्याची पहिलीच वेळ आहे 

सोनल सूर्यवंशी हिचे प्राथमिक शिक्षण डंगिरेवाडी येथे तर ५ वी ते १२ पर्यंतचे शिक्षण सातारा नवोदय विद्यालय खाली येथे झाले ईस्लापूर येथील आर आय टी काॅलेज मध्ये मॅकेनिकल इंजिनियर हा कोर्स झाल्यानंतर पूणे येथे एमपीएससीच्या राज्य सेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करून २०२१ एमपीएससीच्या निकाला मध्ये बीडिओ पदावर निवड झाली त्याचे प्रशिक्षक सुरू असताना गेल्या आठवड्यात लागलेल्या निकाला मध्ये सोनल सुर्यवंशी हिने या परीक्षेत यश मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालून सुर्यवंशी परिवारात पहिला उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवत डंगिरेवाडीत हि सोनलने पहिली उपजिल्हाधिकारी होऊन गावाची व माण तालुक्याची मान अभिमानाने ताट केली असल्याने कु सोनल सुर्यवंशी हिचे अनेकांनी अभिनंदन केले.

"कष्ट, जिद्द चिकाटी बरोबर आई वडिल यांचे मार्गदर्शन या अनमोल यशाचे खरे साक्षीदार आहेत त्याचा पाठबळामुळेच ह्या पदापर्यंत जाऊ शकले असे सोनल रमेश सूर्यवंशी हिने व्यक्त केले"

माण तालुक्यातील म्हसवड येथील येथील सर्व सामान्य कुटुंब टेलरिंग व्यवसाय व केबल व्यावसायातून आपले घर संभाळून एकुलता एक मुलांचे शिक्षण मिळावे यासाठी सतत मेहनत करणारे राजेंद्र तावरे यांच्या रोहण या मुलांने एमपीएससीच्या राज्य सेवा परिक्षे मध्ये घवघवीत यश मिळवत प्रथमश्रेणीचे अधिकारी होण्याचा मान मिळवून तावरे कुंटुबातील अधिकारी होण्याचा मान रोहण राजेंद्र तावरे यांनी मिळवला 

रोहण राजेंद्र तावरे यांचे शिक्षण म्हसवड येथील मेरिमाता हायस्कूल मध्ये इयत्ता १ ते १०वी पर्यंत झाले ११ वी १२ वी शिक्षण लातूर बी टेक शिक्षण रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे झाले एमपीएससीच्या राज्य सेवा परिक्षेच्या तयारी साठी पूणे येथील युनिक क्लासेस मध्ये पाच वर्षे सतत अभ्यास करुन एमपीएससीच्या राज्य सेवा परिक्षेत कल्सावन अधिकारी म्हणून रोहण तावरे यांनी हे मिळवलेल्या यशने म्हसवड शहराची मान उंचावली तर रोहण तावरे पोलीस, महसूल कि शिक्षण विभागातील कोणत्या महत्त्वाच्या पदांवर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आसले तरी म्हसवड येथील देवांग समाजा मध्ये एमपीएससीच्या राज्य सेवा परिक्षेत यश मिळवणारा रोहण तावरे हा दुसरा अधिकारी ठरला आहे. रोहण तावरे यांचे कुटुंब सामन्य गरीब कुटुंब असून कष्ट करुन जिवन जगणारे वडील केबल व्यवसाय तर आई गृहिणी एक बहीण व रोहण हा एकुलता ऐक मुलगा आहे या यशा बदल रोहण राजेंद्र तावरे यास विचारले असता तो म्हणाला 

"हे मला मिळालेले यश हे माझा सततच्या अभ्यास व जिद्दीच्या जोरावर मिळवले आई वडील व गुरुजी मंडळीचे मार्गदर्शन हेच माझ्या यशाचे गमक आहे"

 माण तालुक्यातील चौथा व वरकुटे मलवडी येथील एमपीएससीत दुसऱ्यांदा यश मिळवलेले हर्षवर्धन जगन्नाथ माने यांचे मुळ गाव सातारा व सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील माण तालुक्यातील काळचौंडी हे गाव असून आजोबा पासून ते वरकुटे मलवडी येथे राहत आहेत वडील जगन्नाथ माने हे सेवानिवृत्त शिक्षक तर आई माणदेशी महिला बॅकेच्या संचालिका होत्या एक बहीण आय आय टी मधून निवड होऊन लंडन येथे अॅमेझॉन कंपनी मध्ये नोकरी करत असल्याने घरची परिस्थिती चांगली असल्याने व सर्व कुटुंबच सुशिक्षित असल्याने हर्षवर्धन माने यांचे शिक्षण पहिली ते दहावी पर्यंत वरकुटे मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी झाले १० वी नंतर ११,१२ वी राजस्थान मध्ये केले तर ग्रॅज्युएशन जम्मू काश्मीर मध्ये केल्यानंतर पूणे येथे एमपीएससीचा अभ्यास करून २०२१ मध्ये एमपीएससीच्या राज्य सेवा परिक्षेत यश मिळवल्या नंतर मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून एक वर्षापासून कार्यरत होते २०२२ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या राज्य सेवा परिक्षेत दुसऱ्यांदा यश मिळवल्याने हर्षवर्धन माने पुन्हा वर्ग एकचे अधिकारी म्हणून पोलीस, महसूल कि शिक्षण विभागातील कोणत्या पदावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

"वडील जगन्नाथ माने व मामा सुहास जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि जिद्द अभ्यासात सातत्य ठेवून उच्च ध्येय गाठण्यासाठी ध्यास उराशी बाळगून प्रयत्न केल्यानेच यशस्वी झालो"

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER