खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांचे खास अभिनंदन केले. तर सोमवार पेठ या ठिकाणी रक्तदान शिबीर घेतल्या बद्दल पवार - पाटील कुटुंबाचे विशेष कौतुक केले.
सोमवार पेठ फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
अनिल पवार यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने भारतीय जनता पार्टी सोमवार पेठ च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 62 जणांनी रक्तदान केले.
यावेळी श्रीमती नर्मदा किसन पवार -पाटील, देवाण्णा पवार -पाटील,प्रसाद भैय्या पवार -पाटील, मा. नगरसेवक व गटनेते अशोकराव जाधव, मा. नगरसेवक सचिन अहिवळे, शंकर काका पवार- पाटील,संजूशेठ जाधव, पप्पू शेठ जाधव, संजय गायकवाड, अध्यक्ष फलटण तालुका -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A), उमेश पवार, अमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.