सातारा दि. 17 : शैक्षणिक वर्ष 2024 -25 च्या इयत्ता सहावी व इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती सैनिक स्कूलच्या प्राचार्या मनीषा दबास यांनी दिली आहे.
प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरणे सुरू झाले आहे. इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला - मुलींना सुवर्णसंधी आहे. याकरिता विद्यार्थ्यांचे वय दिनांक 31 मार्च 2024 पर्यत 10 ते 12 वर्ष असावे. तर इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिता दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत त्या विद्यार्थ्याचे वय 13 ते 15 या दरम्यान असावे. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची दिनांक 16/12/2023 (5 वाजेपर्यंत) आहे.
पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचेपरीक्षेचे प्रवेश फॉर्म ऑनलाइन भरणे अत्यंत जरुरीचे आहे. अखिल भारतीय सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर आपणhttps://exams.nta.ac.in/AISSEE या संकेत स्थळाला भेट द्यावी.