ज्यांनी आपल्याला मोठे केले असे लोक सत्ता आल्यावर आमच्यावरच नाराज होत आहेत.ज्यांना सगळे दिले ते नाराज झाले; मात्र ज्यांना काही दिले नाही ते सगळे आजही सोबत आहेत. ही शिवसेनेची ताकद आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे ,राज्यात उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हालतोय. त्यांच्यामध्ये येऊ नका. असे भावनिक आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री फेसबुक लाइव्हवरून राजीनामा देण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ज्यांनी आपल्याला मोठे केले असे लोक सत्ता आल्यावर आमच्यावरच नाराज होत आहेत. ज्यांना सगळे दिले ते नाराज झाले; मात्र ज्यांना काही दिले नाही ते सगळे आजही सोबत आहेत. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यामुळे न्यायदेवतेचा निकाल आपन मान्य केला आहे.
सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला. नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं केलं, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केलं, यामुळे आयुष्य सार्थक लागलं.
उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावं. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की उद्या कोणीही गोंधळ घालू नये. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचं पुण्य जर त्यांच्या पदरात पडत असेल तर त्यांना ते मिळू दे. ते पाप माझं आहे, त्यांच्यावर विश्वास मी ठेवला. उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे त्याचं पालन करणं आवश्यक आहे. लोकशाहीचे पालन झालंच पाहिजे, मी राज्यपालांचे आभार मानतो, केवळ एका पत्रानंतर लगेच त्यांनी हालचाल केली आणि बहुमत सिद्ध करायला सांगितलं. बहुमताचा खेळ मला खेळाचा नाही. तुम्हाला मोठे केले हे माझे पाप आहे. माझ्या पापाची फळ मला भोगावी लागत आहेत, असे म्हणत बंडखोरांना इशारा दिला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असेही ठाकरे म्हणाले.