दिल्ली :
निवडणूक आयोगाच्या दोन नवीन निवडणूक आयुक्तांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे बलविंदर संधू यांची नावे निश्चित करण्यात आलीय. दरम्यान, निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
निवडणुकीची घोषणा होताच देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात.
लोकसभा निवडणुकीसोबतच निवडणूक आयोग जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही जाहीर करणार आहे. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत काय निर्णय होणार? आगामी लोकसभा निवडणूकही 2019 प्रमाणे सात टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.