फलटण प्रतिनिधि :
रामराजेंच्या म्हणण्यानुसार ते मला महत्व देत नाहीत मात्र त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत माझ्यावरच बोलतात तर एवढा शिकलेला व हुशार माणूस चुकीच्या पद्धतीने कसा बोलू शकतो याचे आपणस आश्चर्य वाटत असल्याचे खा. रणजितसिंह म्हणाले, ते फलटण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ॲड. नरसिंह निकम, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा यांची उपस्थिती होती.
रामराजे माझ्या व माझ्या शिक्षणाविषयी बोलले मात्र मला शिक्षणाविषयी बिलकुल बोलायचे नाही कारण मी कधीही म्हणत नाही की मी हुशार आहे, मी तज्ञ आहे, मात्र रामराजे ज्या शिक्षण संस्थेचे संचालक आहेत त्याच शिक्षण संस्थेमधून माझे एस. वाय. पर्यंत शिक्षण पूर्ण झाले असल्याचे खासदार रणजीतसिंह यांनी निदर्शनास आणून दिले.
काळज येथील निरा - देवघरच्या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी निमंत्रण दिले नाही असे रामराजे म्हणाले होते, मात्र रामराजे यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत आले पाहिजे असा मी अट्टाहास केला होता. रामराजे यांच्यासमोरच निरा - देवघर चा कार्यक्रमाचा शुभारंभ व्हावा ही माझी इच्छा होती, त्यामुळे जाणीवपूर्वक रामराजे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापले होते, असे यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. तर फलटण येथे रविवारी होत असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाचे उद्घाटन प्रसंगी फलटण तालुक्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करतानाच रामराजे यांनाही या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रणजितसिंह यांनी केले.
आपण मला दिलेल्या शिव्या मधून मी सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे काम करीन असा उपराधिक टोला यावेळी रामराजे यांना खासदार रणजितसिंह यांनी लगावला. तर रामराजेंच्या कुटुंबाला माझं काय बरं वाईट करायचं असेल तर तेही आपणास मान्य असल्याचे खासदार रणजितसिंह म्हणाले.
रामराजे यांनी माझ्यावर केलेल्या बदनामीचे उत्तर मी त्याच भाषेत देऊ शकतो मात्र त्यांचे वय पाहता आपण आता या पेक्षा जास्त काय बोलणार? असा प्रश्न उपस्थित करताना अन्यथा लोकं मला चुकीचे ठरवतील असे खासदार रणजितसिंह म्हणाले.
फलटण तालुक्यातील विकासासाठी मी आपल्या शिव्या आनंदाने स्वीकारतो त्यासाठी मी कुठे येऊ, माझ्या समोर मला शिव्या द्या, मात्र तालुक्याची इज्जत बाहेर घालवू नका असे रणजितसिंह रामराजे यांना उद्देशून म्हणाले. माझं काय चुकत असेल, मला काही अज्ञान असेल, मला काही कळत नसे,ल माझ्या शिक्षणाची काही अडचण असेल तर आपण मला निश्चित बोध द्यावा, मला आपणाकडून ज्ञान घ्यायची मला इच्छा आहे असा उपोधिक टोला खा. रणजितसिंह यांनी लगावला.
रामराजे यांनी दिलेली आव्हाने फलटणची जनता मला पूर्ण करुन देते त्यामुळे रामराजे यांनी दिलेली आव्हाने माझ्या फायद्याची आहेत. रामराजे यांनी मला पाण्यातून विष जरी दिलं तरी ते मी अमृत म्हणून घ्यायला तयार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर शेवटी म्हणाले.