फलटण | धैर्य टाईम्स | २२ एप्रिल २०२५
भारतीय जनता पक्षाच्या फलटण तालुक्यातील मंडल अध्यक्षांच्या निवडी माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांनी नव्याने केल्या. यावेळी फलटण तालुक्यात भाजपने तीन नव्या मंडल अध्यक्षांची निवड केली आहे. यामध्ये अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विकास उर्फ बापूराव शिंदे यांना भाजपाने तालुक्यात मंडल अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. काल महायुतीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक निसर्ग हॉटेल सुरवडी येथे पार पडली त्यावेळी या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी आमदार सचिन पाटील ,ज्येष्ट नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील , माजी नगराध्यक्ष दिलिपसिह भोसले विश्वासराव भोसले, जयकुमार शिंदे, माणिकराव सोनवलकर, विक्रम भोसले मनिषाताई पांडे, अँड नरसिह निकम , विलास नलवडे , दत्तोभाऊ धुमाळ, शहाजीतात्या भोईटे, विविध आघाड्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.अमोल सस्ते यांनी प्रास्ताविक व बजरंग गावडे यांनी आभार मानले.