सातारा दि. २५ - उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृष्णा नगर, सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची पहाणी केली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, अतुल भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदी उपस्थित होते.
एकाच परिसरात सर्व सोयी असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे उभारण्यात येत असल्याचे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील आदर्श असे हे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल. वैद्यकीय महाविद्यालय कसे असावे याचा हे एक उत्तम उदाहरण राज्या समोर तयार होणार आहे.