फलटण प्रतिनीधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलींना मोफत सायकल वाटप व कामगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
कोळकी येथील विश्रागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त (संकल्प १५००० सायकल वाटपाचा) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गरजू मुलींना ५००० मोफत सायकल वाटप कार्यक्रम रविवार दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता शुभारंभ मंगल कार्यालय, विंचुर्णी रोड, फलटण येथे कामगार मंत्री मा. ना. सुरेशजी खाडे शुभहस्ते माजी खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माण-खटाव विधानसभा आमदार मा. जयकुमार गोरे, सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष मा. धैर्यशील दादा कदम, जेष्ठ नेते मा. प्रल्हाद साळुंखे पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी गरजू मुली व पालकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.
तसेच रविवार दि. १८/८/२०२४ रोजी दुपारी १:३० वाजता कामगार मेळावा भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र शासन, संलग्न संघटनांच्या वतीने आयोजित भव्य कामगार मेळावा व लाभार्थीना लाभ वाटप प्रमुख पाहुणेकामगार मंत्री मा. ना. सुरेशजी खाडे शुभहस्ते माजी खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माण-खटाव विधानसभा आमदार मा. जयकुमार गोरे, सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष मा. धैर्यशील दादा कदम, जेष्ठ नेते मा. प्रल्हाद साळुंखे पाटील व सहाय्यक कामगार आयुक्त सातारा मा. रेवणनाथ भिसले या मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीदत्त कृपा मंगल कार्यालय रावरामोशी पुलाजवळ, फलटण पंढरपूर रोड येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.