फलटण प्रतिनिधी:
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ फलटण पंचवार्षिक निवडणुकीतील १८ जागांसाठी दाखल १२१ उमेदवारी अर्जांपैकी छाननीत १० अपात्र आणि २ दुबार असे एकूण १२ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून १०९ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. दिनांक ६ ते २० एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत मतदान आणि त्यानंतर मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन मतमोजणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ फलटण पंचवार्षिक निवडणुकीतील १८ जागांसाठी दाखल १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यांपैकी सोसायटी मतदार संघातील ११ जागांसाठी ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ८ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून ७३ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत त्यापैकी १ दुबार आहे.या ११ जागांपैकी ७ जागा सर्वसाधारण मतदारसंघातील असून त्यासाठी दाखल ५२ उमेदवारी अर्जापैकी ५ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून त्यापैकी १ दुबार आहे ४७ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. महिला राखीव मतदार संघातील २ जागांसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल होते त्यापैकी १ अपात्र ८ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल होते ते सर्व पात्र ठरले आहेत.
वि.जा.भ.ज. विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील एका जागेसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल होते त्यापैकी २ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून १२ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ जागांसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून त्यापैकी १ दुबार आहे ३१ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण मतदार संघातील २ जागांसाठी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी १ दुबार अर्ज अपात्र ठरला असून २५ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.
अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी २ उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी १ अपात्र ठरला असून एक पात्र ठरला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदार संघातील एका जागेसाठी एका जागेसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल होते त्यापैकी २ अपात्र ठरले असून ५ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. व्यापारी आडते मतदारसंघातील २ जागांसाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल होते ते ४ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. हमाल मापाडी मतदार संघातील १ जागेसाठी १ उमेदवारी अर्ज दाखल होता तो पात्र ठरला आहे.
दिनांक. ६ ते २० एप्रिल रोजी दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.मतदान व मतमोजणी ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. दिनांक. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत मतदान आणि त्यानंतर मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन मतमोजणी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण सुनील धायगुडे यांनी सांगितले आहे.