फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण प्रतिनीधी:- निरा - देवघर कॅनॉलचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची माहिती फलटण येथील पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
कोळकी येथील विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या अनेक कार्यक्रमाची माहिती दिली. यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे यावेळी खा.रणजितसिंह यांनी सांगितले.
नीरा - देवघर प्रकल्पासाठी माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी दुष्काळी माळशिरस , सांगोला, पंढरपूर, फलटण या भागात पाणी आणण्याचं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरत असल्याची भावनिक प्रतिक्रिया यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. फलटण बारामती रेल्वे प्रकल्पामुळे दक्षिणेकडून दिल्लीला जाणारा रेल्वे मार्ग फलटण वरून जाणार असल्याचे यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनात आणून दिले.
दुष्काळी भागातील ७५ गावांना धोम बलकवडी चे तीन ते चारमाही मिळणारे पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बारमाही मिळणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. अतिरिक्त ०.९३ टीमसी व झिरो वॉटर चे आर्धा टीमसी पाणी असे मिळणार असुन ०.९३ टीमसी पाणी फक्त फलटण तालुक्यासाठी उपलब्ध होणार आहे.
३९७५ कोटींच्या नीरा देवघर प्रकल्पासाठी प्रशासकीय मंजुरी देऊन आर्थिक तरतूद करून दिली असून लवकरच काम सुरू होऊन तीन ते चार महिन्यात काम पूर्णत्वास जाईल अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून फलटण येथील नवीन एमआयडीसी चे स्वप्न पूर्णत्वाच जाणार असून स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार देणार असल्याचे खा .रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी धोम बलकवडीचे पाणी, रेल्वे प्रकल्प व एमआयडीसी प्रकल्प पूर्ण करेल या दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती येत्या १७ जानेवारीला होत असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून देत दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कूल प्रांगणावर ऐतिहासिक सभा होणार असून या सभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे , फलटण नगर परिषद चे माजी गटनेते अशोकराव जाधव, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप प्रमुख सचिन कांबळे पाटील व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.