फलटण : सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या लता हिने अतिशय जिद्दीने अभ्यास करत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरीब परिस्थितीतून संघर्ष करण्याची हिम्मत ठेवून, आपले ध्येय निश्चित करून स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती सौ. लता अजित ढेकळे यांनी २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कर सहाय्यक पद यशस्वीपणे प्राप्त केले. त्यांच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व मैत्रीणी, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आई वडील, पती, आजी, आजोबा, समस्त ढेकळे परिवार व वाखरी ग्रामस्थ यांच्याकडूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.