फलटण – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राजेगटा तर्फे शुक्रवार दिनांक 29 रोजी दुपारी 2 वाजता अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती आयोजकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यावेळी मा. आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विधानसभा निवडणूकीत पराभवनंतर या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चिंतन होऊन कार्यकर्त्यांना आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनोबल उंचावण्यासाठी मार्गदर्शन या मेळाव्यात होण्याची असल्याचे समजते आहे.
गेल्या 30 वर्षात राजे गटाला पहिल्यादाच मोठया निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.