फलटण प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघात महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. तर पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह यांना उमेदवारी जाहीर झाल्याने फलटणकरांमध्ये मोठा उत्साह दिसू लागला आहे. अनेकांना धक्का देण्यात पटाईट असणारे फलटण मधील एक नेतृत्व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजपा पक्षात दाखल होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचबरोबर काही संघटनाही भाजपाच्या गोटात लवकरच सामील होत असल्याचे बोलले जात असल्यामुळे आता फलटणचे राजकारणात वेगळ्या वळणावर दिसू लागले आहे.
फलटण येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह यांची उमेदवारी बदलावी अशी जाहीर मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे सांगितले होते. तर याच मेळाव्यामध्ये भाषण करताना अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह यांच्या उमेदवारीला कडून विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर फलटणमधील एक ज्येष्ठ नेता भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तर या नेत्याच्या भाजप प्रवेशाने फलटणमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदार संघातील अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. तर अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. तब्बल 28 वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षेत असणारा फलटण - बारामती रेल्वे मार्ग खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. तर फलटण - लोणंद हा रेल्वे मार्ग सुरु झाल्याने फलटणकरांनी मोठा आनंदोस्तव साजरा केला होता. तर नुकतेच फलटण येथे आर.टी. ओ. कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय अशी महत्वाची व सर्वसामान्य माणसांची जिव्हाळ्याची कार्यालय फलटण येथे सुरु झाली आहेत. गत पाच वर्षात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघ अक्षरशः पिंजून काढला आहे. भाजपाच्या माध्यमातून राज्यातून व केंद्रातून शेकडो कोटींचा निधी माढा लोकसभा मतदार संघात आणला आहे.