महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी हरित सातारा जिल्ह्याचे घेतलेले पाऊल याचाच एक भाग म्हणून श्रीमंत रघुनाथराजे यांनी वृक्षारोपणाचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.
फलटण -
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवार पेठ, फलटण येथे मा. नगरसेवक सनी अहिवळे मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
मंगळवार पेठ फलटण येथे वृक्षारोपण प्रसंगी, मा. नगरसेवक सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, विक्रमभैय्या जाधव, सिद्धार्थ अहिवळे, हरीश (आप्पा)काकडे, जे. एस. काकडे, विकी काकडे, सागर राजपाल अहिवळे, यांच्या सह सनी दादा अहिवळे मित्र मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी वाढदिवस साजरा न करता वृक्षारोपण करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.