फलटण : भारतीय जनता पार्टीच्या फलटण शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनुप शहा यांची नुकतीच निवड करण्यात आली. आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुप शहा यांची निवड महत्वाची मानली जाते.
अनुप शहा यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या राज्यकार्यकारिणी वर उत्कृष्ट काम केले आहे. अनुप शहा यांच्या यांच्या या निवडीबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड.सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
यापूर्वी फलटण शहरांमध्ये अनुप शहा यांनी उत्कृष्ट काम केल्या असून फलटण शहराध्यक्षपदी त्यांच्या निवडीने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.