सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व हिंगणगाव येथील माजी सोसायटी सदस्य अनिल भोईटे यांनी भारतीय जनता पक्षांमध्ये माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्यापाटोपाठ आरडगाव येथील अनेक आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी युवा नेते स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षांमध्ये फलटण तालुक्यात जोरदार इनकमिंग सुरु आहे. आरडगाव येथील प्रवेशाने महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांना मोठे पाठबळ मिळणार आहे.
आरडगाव येथील विजय मधुकर भोईटे,माजी ग्रामपंचायत सदस्य, महेंद्र गणपत भोईटे, माजी चेअरमन आरडगाव विकास सोसायटी, अनिल धोंडीराम भोईटे, माजी चेअरमन आरडगाव, राजेंद्र जगदेवराव भोईटे -सावकार, राजकुमार खशाबा भोईटे, मुरलीधर बबनराव निगडे, पंडित भुजंग भोईटे, विराज विलास काकडे, अशोक बाबुराव शिर्के, उपसरपंच आरडगाव, राजेंद्र अशोक शिर्के, माजी ग्रामपंचायत सदस्य आदींनी भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी अनिल भोईटे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.