छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संपूर्ण फलटण तालुक्याच्यावतीने फलटणमध्ये एकच शिवजयंती साजरी करण्यात येते. मागील वर्षी फलटण तालुक्यातील सर्वांनी मिळून एकच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील वर्षी शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षस्थानी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली होती. यावर्षीही पुन्हा श्रीमंत संजीवराजे यांची निवड एकमताने झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट व डिजिटल मीडियातील पत्रकारांना माहिती देण्यात आली होती.
मात्र शनिवार दिनांक 8 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलटण येथे विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या बैठकीत यावर्षीची शिवजयंती आपणच फलटण तालुक्याच्या वतीने राजकारण विरहित सर्व जाती - धर्मातील घटकांना एकत्रिक घेत करणार असल्याचे समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शिवजयंतीची तयारी दोन्ही गटाकडून सुरू करण्यात आली होती.
मात्र आज पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन गटाच्या वेगवेगळ्या शिवजयंती ऐवजी एकच शिवजयंती होण्याचे संकेत मिळत आहेत अशा प्रकारचे मेसेज आता वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर दिसू लागल्याने शिवप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर या दोन्ही नेत्यांनी शिवप्रेमी मावळ्यांच्या आग्रहाखातर फलटण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एकत्रित शिवाजयंती साजरी करण्याची निर्णायक भूमिका घेऊन शिवप्रेमी मावळ्यांना बळदेणेचे काम केले आहे त्या बद्दल दोन्ही नेतृत्वाचे समस्त फलटण तालुक्यातील शिवप्रेमिंच्या वतीने अभिनंदन केलेचे मेसेज आता व्हाट्सअपच्या ग्रुप वर धडकू लागले आहेत.
फलटण शहरामध्ये दोन शिवजयंती झाल्यातर पोलीस प्रशासनावर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज रात्री पर्यंत शिवजयंती संबंधी भूमिका स्पष्ट होईल अशी चर्चा सोशियल मीडियावर सध्या सुरु आहे.