फलटण नगर परिषेदच्या मालकी आसणारे महात्मा फुले शाॅपिंग सेन्टर येथील अभिजित बार व सयाजी बार अवैध पद्धतीने सुरु असून हे दोन्ही बार तात्काळ बंद करा अन्यथा 15 ऑगस्टला फलटण नगरपरिषद समोर आत्मदहनाचा इशारा कामगार संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव गायकवाड व सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमर झेंडे यांनी एका निवेदनाद्वारे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिला आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, महात्मा फुले शॉपिंग सेंटर मधील गाळे व्यवसाय करण्यासाठी बांधले आहेत त्याला काही नियम व अटीने करारनामा केला आहे. मात्र महात्मा फुले शाॅपिंग सेंन्टर मधिल हाॅटेल आभिजीत बार व सयाजी बार हे दोन्ही हाॅटेल व्यवसायक करारनाम्याचे उल्लंघन केल्याचे कामगार संघर्ष संघटनेने दोन वर्षा पूर्वी निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी १५ दीवसात कार्यवाही करू असे तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी लेखी पञ दिले होते. मात्र कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र दि 15 ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यवाही न केल्यास कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने फलटण नगर परिषदेचे समोर आत्मदहन करण्यात येईल व होणार्या परिणामास नगर परिषद जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.