फलटण | धैर्य टाईम्स ४ जानेवारी २०२४
फलटण येथील युवा उद्योजक तथा युवा नेते व दिवंगत माजी नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे पुतणे अमित भोईटे यांनी राजे गटाला सोडचिट्टी देत भाजपा मध्ये प्रवेश केला. येणाऱ्या काळातील विकासात्मक राजकारण व फलटण शहराला बारामती सारखे आधुनिक शहर बनविण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचे अमित भोईटे धैर्य टाईम्सशी बोलताना म्हणाले.
युवा नेता अमित भोईटे यांच्या भाजपा प्रवेशावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, गुड्डू पवार आदी उपस्थित होते.