प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी सन्माननीय राजेंद्र बोराटे सर यांची निवड झाली त्यानिमित्ताने
माणूस माझे नाव,माणूस माझे नाव,
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव. बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर, परी जिंकले सात ही सागर उंच गाठला गौरीशंकर, अग्नीयान मम घेतचालले आकाशाचा ठाव.
प्रस्तुत कवितेत कवीने मानवतेचे वर्णन केले आहे. मानवी मुल्यांवर विश्वास ठेवून शून्यामधून विश्व निर्मिती करणारा व्यक्ती हा माणुसकीचे मानवतेचे प्रतीक असतो. अशाचप्रकारे मानवीमुल्यांचा आपल्या जीवनात अवलंब करून सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात खडतर प्रवास करत यशाचा शिखर गाठणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री राजेंद्र बोराटे सर
आपण आपले शैक्षणिक जीवन आठवले तर शालेय जीवनात भाषा अभ्यासाचा एक भाग म्हणून निबंध लेखन घेतले जाते. निबंध लेखनामध्ये 'माझा आवडता नेता' हा एक विषय असतो. बरेच विद्यार्थी ठराविक निबंध, नेतृत्वाचे गुण वैशिष्ट्ये पाठच करून ठेवत असतात. पुढे जसजशा इयत्ता वाढत जातात तसतसे आवडते नेते बदलत जातात. नेतृत्वाचे संदर्भ बदलत जातात. लहानपणी नेता, नेतृत्व, व्यक्तिमत्व, समाज कार्य यासारख्या शब्दांचे न समजलेले अर्थ समजू लागतात. वास्तविक जीवनात मग आपण खऱ्या नेतृत्वाचा, आदर्श व्यक्तीचा शोध घेऊ लागतो.
गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी गायलेल्या एका गझलेमधील पुढील ओळी अत्यंत बोलक्या आहेत.
पुस्तकात वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे ?
पुस्तकाला भावलेली माणसे गेली कुठे ? रोज अत्याचार होतो आरशा वरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे ?
खरोखरच आजच्या गतिमान युगात आदर्श, सुस्वभावी आणि खऱ्या अर्थाने समाजसेवा करणारी माणसे गेली कुठे असा प्रश्न पडतो. चांगली माणसे दुर्मिळ झालेली दिसतात. असे असले तरीही काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्याकडे पाहून, भेटून ज्यांच्याशी बोलून मनप्रसन्न होते. माणुसकीचा प्रत्यय येतो. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री राजेंद्र बोराटे सर यांचा जन्म एका शेतकरी कुंटूबात झाला शालेय शिक्षण घेत असताना अनेक संघर्ष करावे लागले बारावी नंतर डी एड ला जाण्यासाठी व्यावसायिक शिक्षण घेतल्यांने कोर्टात धाव घेऊन शासनाच्या विरोधात लढून डी एड ला प्रवेश मिळवला इथेच ख-या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली
रहिमतपूर या ठिकाणी आपल्या मित्रांसमवेत डी एड सुशिक्षित बेकार आजी माजी विद्यार्थ्यांनसाठी डी एड विद्यार्थी संघटनेची स्थापना करून सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करत अनेक डी एड काँलेजवर विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय तसेच शिक्षक भरतीसंदर्भात उपोषणे , धरणे आंदोलने यातून अनेकांना न्याय मिळवून देत स्वतः 1996 साली गाळदेव या ठिकाणी अतिदुर्गम शाळेवर हजर झाले पाच वर्षाच्या सेवेमध्ये विद्यार्थी विकास या ध्येयाबरोबरच आपली सामाजिक क्षेत्रातील कार्य चालू ठेवले
कोळकी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरूणांना एकत्र करून व्याख्यानमाला, रक्तदान शिबीर या उपक्रमातून सामाजिक कार्यातही स्वतःला झोकून दिले 2001 साली फलटण तालुक्यातील सरडेगावठाण या शाळेत रूजू होऊन तेथील शाळेचा कायापालट केला जि प प्राथमिक शाळा वाघाचीवाडी आणि सध्या सावंतवाडी येथे कार्यरत आहेत. फलटण तालुक्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्य पाहताना शिक्षकांच्या अनेक प्रश्नसाठी लढा देणारा नेता म्हणून त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले शिक्षकांच्या प्रश्नाबाबत धरणे, आंदोलने मोर्चे , या सनदशीर मार्गांचा अवलंब करत आपले शैक्षणिक कार्य सुरू ठेवले आहे. आजपर्यंत आपण शिवछत्रपती क्रीडा व गणेशोत्सव मंडळ भगवा कट्टा कोळकी चे संस्थापक सदस्य
कोळकी ग्रामविकास प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष डी एड विद्यार्थी संघटनेचे मा अध्यक्ष
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघ मा. अध्यक्ष सातारा जिल्हा शिक्षक संघाचे माजी सरचिटणीस प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान संचालक ते शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमनपदी विराजमान झाला आहात.
एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांना
कुठलेही मज रुप मिळो, देह जळो अन जग उजळो !
अशाप्रकारे मिळालेल्या प्रत्येक शाळेवर आणि पदावर बोराटे सरांचे कार्य आदर्श असेच आहे.
साधी राहणी, उच्च विचार (Simple living and high Thinking!) असलेल्या सरांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्राला लाभलेले उत्कृष्ट नेतृत्व त्यांच्या अष्टपैलू गुणांमुळे आपण आदर्श प्रेरणेचा आणि सामर्थ्याचा स्रोत ठरला आहात याचा मनस्वी हेवा वाटतोय. याशिवाय मनात एक प्रश्नही येतो. एकाच व्यक्तीमध्ये इतके सारे गुण कसे काय ठासून भरू शकतात ? ज्यांची वाणी सुंदर..त्याहूनही प्रयोगशीलता संघटन कौशल्य सारेच कसे असामान्य आणि विलोभनीय ...एक दैदीप्यमान कारकीर्द आपण निर्माण केलीय अगदी सामान्य भाषेत सांगायचे तर,राजेंद्र बोराटे गुरुजी म्हणजे, एक अद्भुत 'रसायन' च आहे. हे रसायन ना कधी शमले...ना कधी थमले...ना कधी यातील ऊर्जेची तीव्रता कमी झाली....ना कधी कमी होईल.
आज आपली प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी झालेली निवड निश्चितच सर्व सभासदांसाठी समस्त शिक्षकवर्गासाठी अभिमानास्पद आहे
आपण सभासद हितासाठी आणि बँकेच्या दैदिप्यमान कारकीर्दीसाठी कटिबद्ध राहाल यात तिळमात्र शंका नाही.