फलटण प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अभिनव सतीश जंगम याने जिल्ह्य शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत ११६ वा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कै. मल्हारराव सस्ते विद्यालय सस्तेवाडी तालुका फलटण या विद्यालयातील अभिनव सतीश जंगम यांने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२३ च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यात गुणवत्ता यादीत ११६ वा व तालुक्यात नववा क्रमांक मिळवला असून, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये रजत पदक आणि मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये ए ग्रेड प्राप्त करून यश संपादन केले आहे. त्याला शिक्षक बजरंग गायकवाड, विश्वास घनवट, सुनील केंजळे, विठ्ठल पवार व श्री कवडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिव समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी प्राचार्य रणदेव खराडे, मुख्याध्यापक अजित गायकवाड, मुख्याध्यापक शिवाजीराव पवार, संचालक राजेंद्र नागटिळे, प्रा.रवींद्र कोकरे, कमला निमकर बालभवनचे मुख्याध्यापक श्री जगदाळे, तसेच सौ. कुमुदिनी स्वामी व सौ सुशीला जंगम, सदाशिव स्वामी व शिवाजी जंगम, प्रा. मिलिंद स्वामी, महेश जंगम, प्रा. सतीश जंगम,सौ. पद्मजा जंगम यांनी अभिनंदन केले.