राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही मिटलेल्या नाही. त्यामुळे सकल मराठा समाजाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे सकल मराठा समाजाने ही घोषणा केली आहे. येत्या 14 तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा असे आवाहन सकाळ मराठा समाजाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने आंदोलन वाढवल्यानंतर सरकारने परिपत्रक काढून मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असल्याचे जाहीर केले होते. मात्र अद्याप त्याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळेच पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुसऱ्या बाजूला 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक सकल मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र बंदचे मेसेज देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीला घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने आपल्या आंदोलन वळवले होते. परंतु मुंबईच्या वेशीवर जाण्यापूर्वीच सरकारने त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. तसेच या संबंधित जीआर देखील काढण्यात आला. परंतु अद्याप याची अधिकृतपणे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा मराठा समाजाला फसवत आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. आता जोपर्यंत सरकार सर्व मागण्यांची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.