फलटण प्रतिनिधी : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. यापुढेही खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून विकास घडवायचा असेल व केवळ भूल थापांना बळी पडायची नसेल तर खासदार रणजितसिंह यांना राजकीय ताकद देणे फलटणकरांचे कर्तव्य आहे. याच भावनेतूम आज अक्षत रेसिडेन्सी फलटण व बिरदेव नगर, जाधववाडी येथील राजेगट कट्टर समर्थक अमोल अहिवळे, राहुल शिंदे, रोहित माने, सागर मोरे, वासू कारंजे,अभिजित बरडकर यांनी फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तर भविष्यात खासदार गटाचे काम करण्याचे वचन दिले आहे.
मागील पाच वर्षात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. निरा- देवघर, धोम -बलकवडी जोड कालवा प्रकल्प येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण करून ते पाणी खंडाळा तालुक्यापासून आदर्की ताथवडा, गिरवी अगदी फलटण तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत कालव्यामधून हा कालवा बारमाही करण्यासाठी काम सुरू असल्याचे यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
फलटण - लोणंद प्रत्यक्षात रेल्वे सुरू केली असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला फलटण - बारामती रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात काम सुरू केले आहे.
फलटणकरांसाठी आरटीओ ऑफिस सुरू केले असून जिल्हा सत्र न्यायालय फलटण येथे सुरू झाले आहे. तर फलटण - सातारा, फलटण- पुसेगाव, फलटण- सीतामाई घाट, कुळकजाई रस्ता, फलटण- दहिवडी रोड, फलटण -आसू रोड असे फलटण तालुक्यातील रस्त्याची कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून सुरू असल्याचे शेवटी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली.
भाजपकडे सातत्याने युवक वर्ग आकर्षिला जात असून, त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळेल असे बोलले जात आहे.