फलटण - फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण येथील प्रभाग क्रमांक १० व ११ येथे फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सोमवार दि. ११ रोजी सकाळी १० वाजता श्रीमंत रामेश्वर महागणपती येथे प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर हे राजकारणात एक आक्रमक व मुस्सदि राजकारणी म्हणून सुपरिचित आहेत. समशेरसिंह यांच्या हस्ते होत असलेल्या प्रचार शुभारंभ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.