फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जवळपास १२ कोटींच्या ३८ कामास प्रशासकिय मान्यता मिळाली असून पुढील काही दिवसांत ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याची माहिती आमदार दिपक चव्हाण यांनी दिली. लक्ष्मीविलास पॕलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आमदार दिपक चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार दिपक चव्हाण म्हणाले की, दिनांक ४ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी सातारा यांनी गोळीबार मैदान येथे पाण्याची उंच टाकी बांधणे व अनुषंगिक कामे करणे, बारवबाग येथे पाण्याची उंच टाकी बांधणे व अनुषंगिक काम करणे, सुधारित जलकेंद्र ते गिरवी नाका मेन रायझिंग ५० एचपी मोटर खरेदी करून बसवणे भाग एक व भाग दोन, प्रभाग क्रमांक ६ ब्राह्मण गल्ली येथील डीपी शिफ्ट करणे, वेलणकर दत्त मंदिर ते नेहरू चौक ते कॉलेज रोड दत्त मंदिर रस्ता करणे अशा ४ कोटी २६ लाख २७ हजार ७४२ रुपयाच्या कामास वैशिट्यापूर्ण योजने अंतर्गत २०२३-२४ साठी प्राप्त अनुदानातून प्रस्तावित केलेला कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तसेच कृषिराज कॉलनी येथील सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, मथुरा पेटीतील कदम घर ते करणे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे, साईबाबा मंदिर स्वागत कमान रोड ते बर्गे गॅरेज रस्ता करणे, उदय मांढरे घर ते प्रवीण घनवट घर रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग 12 मुक्ती आंगण अपार्टमेंट ते एल.बी कदम घर रस्ता करणे व संरक्षित भिंत, प्रभाग क्रमांक 12 लक्ष्मीनगर नवीन सुविधा हॉस्पिटल येथे रस्ता करणे, प्रभाग क्रमांक 12 भोरी मशीद ते मुक्ती आंगण अपार्टमेंट ते एल बी कदम घरापर्यंत चार इंची पाण्याची वितरण नलिका बसवणे प्रभाग क्रमांक 12 सहारा साडी सेंटर ते निंबाळकर घरापर्यंत पाण्याची नलिका बसवणे, हडको वसाहत चार ठिकाणी लादीकरण करणे, महाराजा मंगल कार्यालय परिसर कदम घर ते फिरोज बागवान प्लॉट पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक १० दिलीप पवार घर ते नाथ मंदिर पाण्याची वितरण नलिका बसवणे, हनुमान नगर काळोखे वस्ती पाण्याची वितरण नलिका बसवणे, अहिंसा मैदान लगतचा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे मंगलताई मठासमोर परिसर सिमेंट काँक्रीट करणे डॉक्टर गुंगा ते बाजारे घरासमोरील परिसर सिमेंट काँक्रीट करणे सम्राट जनरल स्टोअर शेजारील परिसरामध्ये सिमेंट काँक्रीट करणे संत बापुदास नगर कमान करणे, प्रभाग क्रमांक ८ कर्णे घर ते खडकहिऱ्या ओढ्या परीनी रस्ता कॉंक्रीकरण करणे, पद्मावती नगर स्वरा कॉर्नर ते शशिकांत थोरात घरापर्यंत तीन इंची व्यासाची पिण्याची पाण्याची वितरण नलिका बसवणे, पद्मावती नगर अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ६ शनी नगर बाणगंगा नदी संरक्षण भिंत बांधणे, उमाजी नाईक चौक कोंढवाडा परिसर मेटकरी गल्ली परिसर व पवार गल्ली परिसर इतर सार्वजनिक वापराची बोळामध्ये पेविंग लादिकरण करणे तसेच गटर करता सिमेंट पाईप बसवणे चेंबर बांधणे, प्रभाग क्रमांक ९ अविनाश चोरमले घर ते समशेर शेख घर काँक्रिटीकरण करणे, कोळपे घर ते रामदास निकम घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, बेडके घर ते रामभाऊ जगताप घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, अहिवळे घर ते फडतरे घर सिमेंट काँक्रिटीकरण करणे, शिवाजी रोड येथील अंतर्गत बोळे काँक्रिटीकरण करणे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर परिसरामध्ये पेविंग ब्लॉक बसवणे, पवार घर ते मलाणी घर रस्ता डांबरीकरण करणे, बर्गे घर ते जाधव घर रस्ता डांबरीकरण करणे, रवींद्र बेडकीहाळ घर कांबळे घरापर्यंत बोल सिमेंट काँक्रिटीकरण करणे अशा ३३ कामांना ७ कोटी ४१ लाख ०५ हजार ३०१ रुपयाच्या कामास वैशिट्यापूर्ण योजने अंतर्गत २०२३-२४ साठी प्राप्त अनुदानातून प्रस्तावित केलेला कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
यावेळी आमदार दिपक चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटण शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पुढील काही दिवसांत ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार आहे. याचबरोबर पुढील काळात फलटण शहरातील विविध कामांची मंजुरीही लवकरच मिळणार आहे. यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण नगर परिषदेस महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकङून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत कामांना २० कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या सहकार्याने फलटण शहरातील एकूण ३८ महत्त्वपूर्ण कामे या निधी मुळे मार्गी लागणार आहेत.