सातारा दि.22 : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे मार्फत घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. आज बिबी या गावातील काही मतदारांची प्रांताधिकारी सुनिल गाढे व तहसीलदार रमेश पाटील यांनी स्वतः पडताळणी करून या कामाचा आढावा घेतला .
.
या मोहीम दरम्यान मयत, स्थलांतरित , दुबार, 80 वर्षांवरील मतदारांची माहिती संकलित केली जाणार आहे. अवरडे,कुठरे व ढेबेवाडी महसूल मंडळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक ,पोलीस पाटील ,कोतवाल यांची बैठक घेऊन घरोघरी पडताळणी काम गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच घरोघरी पडताळणी समयी स्थानिक पोलीस पाटील, तलाठी व परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी होते.