फलटण | धैर्य टाईम्स |
फलटण नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रारूप प्रभाग रचना फलटण नगरपरिषद यावरील हरकत घेण्याचा शेवटचा दिवशी 31 ऑगस्ट 2025 दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 97 हरकती या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या आहेत. त्या हरकतींची सुनावणी उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांचे दालणात उपविभागीय कार्यालय फलटण या ठिकाणी बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजले पासून होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी दिली.
प्रारूप प्रभाग रचनेच्या लेखी हरकती मुदतीमध्ये दाखल केलेले आहे त्या सर्वांनी सुनावणीसाठी वरील नमूद केलेल्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी फलटण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे
प्रभाग 2 करीता 6 हरकती (समान आशयाच्या 83 हरकती) प्रभाग 8 करीता 2 हरकती, प्रभाग 13 करीता 1 हरकत ( एकूण 3 पण सारखे आशय) प्रभाग 9 करीता 1 हरकत, प्रभाग 6 करीता 1 हरकत सर्वसाधारण प्रभाग रचना करिता 2 हरकती घेण्यात आल्या आहेत.
फलटण नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीत एकूण १३ प्रभाग असून त्यापैकी १२ प्रभाग द्विसदस्यीय आणि एक प्रभाग त्रिसदस्यीय असणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीद्वारे एकूण २७ सदस्य निवडून द्यायचे आहेत.