फलटण प्रतिनिधी - विविध मेंटेनन्स कामाकरिता आज मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.
HT/LT लाइन व DTC मेंटेनन्सच्या कामाकरिता 22KV फलटण शहर सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00, 22KV साईनगर फिडर सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरील फिडर वरील विद्युत पुरवठा बंद राहणार असून काम लवकर पूर्ण झाले तर दिलेल्या वेळेपूर्वी सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. याची सर्व महावितरण च्या ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरण च्या वतीने करण्यात आले आहे.