भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे. हेलिकॉप्टर बऱ्याच दिवसांपासून वापरात नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी पायलटने या हेलिकॉप्टरचे उड्डाण घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे हेलिकॉप्टर कोसळले.
अरुणाचल प्रदेश : भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाची बाब हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट आणि तीन क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे. हेलिकॉप्टर बऱ्याच दिवसांपासून वापरात नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी पायलटने या हेलिकॉप्टरचे उड्डाण घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघाताचे कारणे अद्याप उघड झालेली नाहीत. अपघातानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.