केंद्र सरकारतर्फे प्रतिवर्षी राबवण्यात येणार्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
कराड नगरपालिकेने सलग सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नगरविकासमंत्री माधुरी मिसाळ, कराड पालिका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, (मूळ फलटणचे सध्या कराड येथे कार्यरत असणारे )आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या पाच राज्यांचा समावेश आहे.
या पाच राज्यांतील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील नगर पालिकांमध्ये कराड पालिकेने प्रथम द्वितीय क्रमांक मिळवला. यापूर्वी 2019 व 20 अशी दोन वर्षे कराडने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. तर 2021 साली सहावा तर 2022 मध्ये देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. 2024 मध्ये या स्पर्धेची तयारी केली होती. या स्पर्धेत कराडने देशात पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्ली येथे गुरूवारी झालेल्या या पुरस्कार वितरण प्रसंगी पालिकेचे शहर समन्वयक आशिष रोकडे, विभाग प्रमुख संदीप रणदिवे, मुकादम किरण कांबळे, शेखर लाड, फैय्याज बारगिर, अशोक डाईंगडे, संजय तावरे, स्वप्नील सरगडे यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल कराडकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.