फलटण प्रतिनिधी -
जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड फलटणच्या माध्यमातून प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या आपली फलटण मॅरेथॉन यावर्षीच्या म्हणजेच "आपली फलटण मॅरेथॉन २०२५" च्या आयोजनाचा शुभारंभ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक १ऑगस्ट २०२५ रोजी केला असून यावर्षी दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली आहे.
अवयवदानला प्रोत्साहन( Support Organ Donation ) ही संकल्पना घेऊन आयोजित करण्यात येत असलेल्या या मॅरेथॉनसाठी पहिल्या महिला पोलीस आयुक्त श्रीमती मीरा बोरवणकर प्रमुख पाहुण्या आणि ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत.
मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.
आपली फलटण मॅरेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून तो एक आरोग्य वर्धक मेळावाच असल्याचे आणि १२ ते ८५ वर्षे वयोगटातील सर्वाना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आवर्जून सांगताना गेल्या २५ वर्षांपासून फलटण येथे जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या माध्यमातून कार्यरत असताना अस्थिरोग उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील शस्त्रक्रिया करुन अविरत सेवाकार्य सुरु असताना येथे उपचार घेणारे रुग्ण आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१५ पासून गेली सलग ९ वर्षे सर्वांनी एकत्र येवून दि. १२ आक्टोबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्वांना केले आहे.
आपली फलटण मॅरेथॉन मध्ये संपूर्ण भारतात प्रथमच १००० हून अधिक रोबोटिक नी रिप्लेसमेंट (गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतरचे)आणि खुब्याचे संधेरोपण केलेल्या रुग्णांसाठी ३ कि. मी. अंतराची वॉकेथॉन आयोजित करण्यात येणार आहे.
३ कि. मी. अंतराची छोट्या मुले/मुलींसाठी फन रन (हसत खेळत बाल गट) ही एक नवीन श्रेणी यावर्षी सुरु केली आहे.
६५ वर्षांवरील लोकांसाठी ३ कि. मी. अंतराची वॉकेथॉन नेहमीप्रमाणे आयोजित करण्यात येत असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
या मॅरेथॉनचा मार्ग ऊसाची शेती, फळांच्या बागा आणि द्राक्षांच्या मळ्यांमधून जात असल्यामुळे अत्यंत नयनरम्य आहे. संपूर्ण मार्गावर चांगल्या हायड्रेशनची सोय आहे.
मॅरेथॉन पूर्वी आकर्षक झुम्बा वॉर्मअप होईल.
मॅरेथॉननंतर मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
आपली फलटण. मॅरेथॉन मध्ये खालील श्रेणी आहेत :
१) १८ ते ३० वर्षे (जोशपूर्ण युवा गट),
२) ३१ ते ४५ वर्षे (सळसळती तरुणाई),
३) ४६ ते ६४ वर्षे (प्रगल्भ प्रौढ)
हे तीनही गट त्यांच्या क्षमतेनुसार
२१ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि. मी. धावू शकतात.
२१ km ची रन या वर्षी पहिल्यांदाच आयोजित करत असल्याचे डॉ प्रसाद जोशी यांनी नमूद केले.
आपली फलटण मॅरेथॉन साठी नोंदणी शुल्क : पुरुषांसाठी ७५० रुपये, महिलांसाठी ५०० रुपये, मुलांसाठी (१२ ते १८ वर्षे) ३०० रुपये, ३ कि.मी. फन रनमध्ये सहभागी होणाऱ्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही.
खालील लिंक वर क्लिक करून आपण आता सहज रजिस्टर करू शकता अथवा QR code scan करू शकता.
https://alpharacingsolution.com/e/apli-phaltan-marathon-2025
मॅरेथॉन किटमध्ये एक आकर्षक टी-शर्ट, टाइम चिपसह बिब, टोपी, एनर्जी बार आणि एक सरप्राइज गिफ्ट देण्यात येणार आहे,
आणि सर्वात महत्त्वाचे :
पहिल्या ३ श्रेणी जोशपूर्ण युवा, सळसळती तरुणाई, प्रगल्भ प्रौढ यांच्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र बक्षिसे असतील.
पहिले बक्षीस : १०००० रुपये,
दुसरे बक्षीस : ७००० रुपये आणि
तिसरे बक्षीस : ५००० रुपये आहे.
ही बक्षिसे जिंकण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे. प्रत्येकाला मॅरेथॉन पूर्ण केल्याचे सन्मानचिन्ह आणि ई सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
नोंदणी लिंक आता खुली असून नोंदणीची अंतिम तारीख दि. २० सप्टेंबर २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लवकर नोंदणी करा असे आवाहन
डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी केले आहे.