सातारा दि. 21 :
वाई येथे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती मधील विद्यार्थिनींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच प्रवेश मिळाल्यानंतर मोफत भोजन व निवास सुविधा तसेच शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदी करता रोख रक्कम दिली जाते.
तरी अनु जाती, अनु जमाती, ईतर मागास प्रवर्ग, अनाथ व दिव्यांग या संवर्गातील विद्यार्थिनींनी बीसी व ईबीसी मुलींचे शासकीय वस्तीगृह वाई येथे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन गृहपाल यांनी केले आहे.